महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार महापूर : 10 लाख पूरग्रस्तांमध्ये मदत साहित्याचे वितरण - राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग बिहार

सततच्या पावसाने बिहारमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. महापुरात अडकलेल्या लोकांना मदत साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय. जवळपास 10 लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे.

बिहार महापूर
बिहार महापूर

By

Published : Jul 26, 2020, 8:25 AM IST

नवी दिल्ली - बिहारमधील पूरस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. सततच्या पावसाने बिहारमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. महापुरात अडकलेल्या लोकांना मदत साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येतोय. जवळपास 10 लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे.

मदत पॅकेटमध्ये अडीच किलो तांदूळ, एक किलो हरभरा, 500 ग्रॅम गूळ, आगपेटी आणि मेणबत्तीचे पॅकेट आहे. पूरग्रस्तांच्या कुटुंबीयांची ओळख पटल्यानंतर राज्य सरकार त्यांना सहा हजार रुपयांची मदत रक्कमही देणार आहे. माहितीनुसार 10 जिल्ह्यांमधील 10 लाख 61 हजार लोक प्रभावित आहेत. एनडीआरएफची 13 पथके आणि एसडीआरएफची आठ पथके बचाव कार्य करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमधून उत्तर बिहारमधील 10 जिल्ह्यांमध्ये एकूण 1 हजार 940 मदत पॅकेट टाकण्यात आल्याची माहिती पाटणा जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागातर्फे बिहारमध्ये 30 पथके कार्यरत आहेत. तसेच राज्य पातळीवरील आठ पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत या पथकांनी 40 हजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details