महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मराठमोळे जिल्हाधिकारी बिहारमधील पूरग्रस्तांच्या मदतीला; पुरात वाहून चाललेल्या व्यक्तीचे वाचवले प्राण

कपिल शिरसाठ हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असून सध्या मोतिहारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील संग्रामपूर भागातील पूरग्रस्त गावाला भेट देण्यास गेले असता जिल्हाधिकारी कपिल शिरसाठ यांनी एका व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

जिल्हाधिकारी कपिल शिरसाठ
जिल्हाधिकारी कपिल शिरसाठ

By

Published : Jul 25, 2020, 4:45 PM IST

Updated : Jul 25, 2020, 5:06 PM IST

पाटना - सततच्या पावसाने बिहारमधील नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. अनेक जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्व चंपारण जिल्ह्यातील नद्यांना पूर आल्याने मोतिहारी जिल्ह्यातही पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीत आपत्ती निवारण पथकात मोतिहारीचे जिल्हाधिकारी कपिल अशोक शिरसाठ आणि पोलीस अधिक्षक नावेद चंद्रा यांनी बचावकार्यात सहभाग घेतला आहे.

कपिल शिरसाठ हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील असून सध्या मोतिहारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील संग्रामपूर भागातील पूरग्रस्त गावाला भेट देण्यास गेले असता जिल्हाधिकारी कपिल शिरसाठ यांनी पुराच्या पाण्यात वाहून चाललेल्या एका व्यक्तीला बाहेर काढले. गंडक नदी पूर पातळी ओलांडून वाहत असल्याने आजुबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झाले आहे. गंडक नदीचे पाणी अरेराज, संग्रामपूर, कोटवा आणि केसरिया या प्रभागातील गावांमध्ये शिरले आहे.

परिस्थिती गंभीर बनल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे. मोटार, बोटीद्वारे त्यांनी या भागात आढावा घेण्यास सुरू केले आहे. ‘गंडक नदीचा चंपारण येथे तट फुटल्याने चार प्रभागात पाणी शिरले आहे. ’नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी करण्यात येत असून अन्नाची पाकिटेही देण्यात येत आहेत', असे मोतिहारीचे जिल्हाधिकारी कपिल शिरसाठ यांनी सांगितले. या भागात एनडीआरएफची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत.

मराठमोळे अधिकारी कपिल शिरसाठ

कपिल अशोक शिरसाठ हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आहेत. 2011 च्या आयएएस तुकडीतील ते बिहार केडरचे अधिकारी आहेत. ते एका शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी बिहारमधील मधुबनी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते मोतिहारी जिल्ह्यात कार्यरत आहेत.

Last Updated : Jul 25, 2020, 5:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details