महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहार महापूर: एनडीआरएफची १९ पथके कार्यरत, २९ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात एनडीआरएफ जवानांची १९ पथके तसेच इतर बचाव पथके कार्यरत आहेत. आज पटनामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलीकॉप्टरमधून अन्न तसेच मदत सामग्री देखील पोहोचवण्यात आली.

बिहार महापूर

By

Published : Sep 30, 2019, 5:53 PM IST

Updated : Sep 30, 2019, 7:09 PM IST

पाटना - बिहारमध्ये महापुरामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात १९ एनडीआरएफ पथकांसह इतर बचाव पथकांच्याद्वारे बचावकार्य सुरू आहे. त्यातच आज, पटनामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलीकॉप्टरमधून अन्न तसेच मदत सामग्री देखील पोहोचवण्यात आली.

पाटनामध्ये सर्वात गंभीर परिस्थिती आहे. पावसामुळे घरे, शाळा, कार्यालये तसेच रूग्णालयांमध्येदेखील पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही बरेच लोक पुरामध्ये अडकले आहेत. पावसाची संततधार सुरुच आहे.दरम्यान, २६ सप्टेंबरलाच सरकारला याविषयी धोक्याचा इशारा दिला गेला होता असा खुलासा हवामान विभागाने केल्यामुळे, वेगळेच नाट्य सुरु झाले आहे. त्याआधी, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी या सर्व परिस्थितीचे खापर हवामान विभागावर फोडले होते. सोबतच, पूर्वेकडील दोन-तीन जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये लवकरच पाऊस थांबेल असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
Last Updated : Sep 30, 2019, 7:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details