महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये पूर परिस्थितीमुळे 21 जणांचा मृत्यू; 69 लाख लोकांना पुराचा फटका - बिहार पूर लेटेस्ट न्यूज

बिहार राज्यातील उत्तरेकडील भागात पूर परिस्थितीमुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील 69.03 लाख लोकांना फटका बसला. बिहार राज्यातील 16 जिल्ह्यामध्ये पूरस्थिती आहे.

Bihar flood news
बिहारमध्ये पूर परिस्थिती

By

Published : Aug 7, 2020, 9:11 AM IST

पाटणा-बिहार राज्यातील पूर परिस्थितीमुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सिवान जिल्ह्यातील दोन जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या उत्तरेकडील भागातील 69 लाख लोकांनापूर परिस्थितीचा फटका बसला आहे.

बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुरुवारी झालेले दोन मृत्यू हे सिवान जिल्ह्यामध्ये झाले आहेत. राज्यातील एकूण 16 जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे, याचे कारण नेपाळमध्ये उगम झालेल्या आणि भारतात येणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

पूर परिस्थितीमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येमध्ये दरभंगामधील 7, मुजफ्फरपूरमधील 6, पश्चिम चंपारण्यमधील 4, आणि सिवानमधील 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पूरपरिस्थितीचा राज्यातील 69.03 लाख लोकांना फटका बसला असून एका दिवसात यामध्ये तीन लाख लोकांची वाढ झाली आहे. 1185 ग्रामपंचायत क्षेत्रांना पुराचा फटका बसलाय.

खगरिया जिल्ह्यातील तांटी तोला येथे बुधी गंडक नदीवरील तटबंदीला भगदाड पडले. तटबंदीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री संजय कुमार झा यांनी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन ट्विटर वरुन केले आहे. सीतामढी, सुपौल, श्योहर, किशनगंज, पूर्व चंपारण्य, गोपाळगंज, सहरसा, मधेपुरा, मधुबनी आणि समस्तीपूर या जिल्ह्यांना देखील पुराचा फटका बसला आहे.

पुराचा फटका बसलेला 4 लाख 82 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 12239 लोकांना आठवणी निवारा कॅम्प मध्ये ठेवण्यात आले. 1402 कम्युनिटी किचन च्या माध्यमातून दहा लाख लोकांना जेवण पुरवले जात आहे. एनडीआरएफची 20 पथके राज्यात पूर परिस्थितीत मदत करण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. त्यासोबतच एसडीआरएफचीपदके देखील तैनात करण्यात आली आहेत

एनडीआरएफचे कमांडंट विजय सिन्हा यांनी आमच्या पथकाने 11 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले, असे सांगितले. एनडीआरएफ पथकांकडून नागरिकांना वैद्यकीय सुविधा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. गरोदर महिला, लहान मुले व वृद्ध नागरिक यांची विशेष काळजी घेतली जात आहे. दरभंगा मधील एका गावातील अर्थ 40 वर्षीय व्यक्तीला सर्पदंश झाला त्याला तातडीने हनुमान नगर च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details