चंपारण्य (बिहार) - मुसळधार पावसामुळे याठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक लोकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. मंगलपूर कला गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्यामुळे तेथील लोकांना झोपड्यांच्या छतावर बसण्यास भाग पाडले जात आहे. पूरपरिस्थितीमुळे बेतियाह जिल्हा मुख्यालयापासून 2 कि.मी. अंतरावर नौटान ब्लॉकमध्ये असलेले मंगलपूर कला हे गाव बेट बनले आहे.
अनेक गावकरी सुरक्षित जागेचा शोध घेत स्थलांतरीत होत आहेत. तर दुसरीकडे घरातील वस्तूंचे रक्षण करताना प्रशासनाकडून काही दिलासा मिळावा, या आशेने मोजकेच लोक येथे शिल्लक आहेत.
येथे पूर्ण भाग पाण्यात व्यापला गेला आहे. त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. या पुरपरिस्थितीमुळे घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत.
मागील सहा दिवसांपासून याठिकाणी प्रशासनाकडून कोणीही विचारपूस करायला आले नाही. प्रशासनाकडून या परिस्थितीची दखल घेतली नाही, असा आरोपी गावकऱ्यांनी केला आहे. त्यांना पूरपरिस्थिती दरम्यान अन्न, औषधे, पिण्याचे पाणी आणि निवारा या आवश्यक गोष्टीदेखील मिळाल्या नाहीत.
महिला आणि मुलांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या टेन्टमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. तर माणसे या पुरस्थितीमध्ये जे काही उरले आहे ते वाचविण्यासाठी घराच्या छपरावर स्थिरावले आहे.