पाटणा - बिहार विधानसभेचं रणशिंग फुंकण्यात आलंय. तारखा जाहीर झाल्यानंतर कोरोना काळात नेत्यांची जनतेपर्यंत पोहचण्याची धडपड सुरू झालीय. आज बिहार विधानसभा निवडणुकांसाठी महागठबंधनमध्ये जागावाटप झाले असून राष्ट्रीय जनता दल 144, काँग्रेस 70 आणि डावे पक्ष 29 जागांवर लढणार आहेत. यावेळी सर्वच पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याचबरोबर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणार असून यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे.
बिहार विधानसभा निवडणूक सीपीएम 4, सीपीआय 6, सीपीआय (मा-ले) 19, काँग्रेस 70 आणि राजद 144 जागांवर लढणार आहे. राजद नेता तेजस्वी यादव आणि काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यादरम्यान चर्चा झाल्यानंतर जागांची घोषणा करण्यात आल्याची माहिती आहे.