नवी दिल्ली - कोरोना संकटात बिहारमधील पूरस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. पूरामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यामुळे दरभंगा जिल्ह्यातील जनतेला पूर-संबंधित संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर वीज दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत.
बिहार महापूर : दरभंगा जिल्ह्यातील वीज खंडीत; गावं अंधारात - बिहार महापूर
दरभंगा जिल्ह्यातील जनतेला पूर-संबंधित संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर वीज दुरुस्तीची कामे सुरु करण्यात आली आहेत.
बिहार महापूर
बिहारमधल्या जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये वीज पडून जीवित तसंच वित्तहानी झाली आहे. रस्ते, शेत, नद्या आदींमध्ये पाणीच पाणी असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार सरकारने सर्व मृतांच्या नातेवाईकांना चार लाख नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. जवळपास 10 लाख लोकांना पूराचा फटका बसला आहे.