मुजफ्फरपूर -बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात मुख्य न्यायिक दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयात खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरविरोधात खटला दाखल झाला आहे. भोपाळमधून भाजपच्या खासदार असलेल्या साध्वींनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. या कारणाने मुझफ्फरपूर येथील राजू नय्यर यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
साध्वींच्या वक्तव्यानंतर संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. शुक्रवारी राजू नय्यर यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली. प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्यामुळे सर्व देशवासियांना मोठा धक्का बसला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.