पाटणा - बिहारमधील दरभंगा भागात पुराचा कहर कायम आहे. राज्यातील १२ भागात पुराचा फटका बसला आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. यासंबंधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत माहिती दिली आहे.
बिहारमध्ये पुरामुळे २५ लोकांचा मृत्यू; २५ लाखांपेक्षा जास्त प्रभावित - नितीश कुमार - पाटणा
नितीश कुमार यांनी माहिती देताना सांगितले, की राज्यात अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील १६ जिल्ह्यातील २५ लाख ७१ लाख पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
नितीश कुमार यांनी माहिती देताना सांगितले आहे, की राज्यात अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील १६ जिल्ह्यातील २५ लाख ७१ लाख पुरामुळे प्रभावित झाले आहेत. यासंबंधी बचाव आणि मदतकार्य जलदगतीने निर्देश देण्यात आले आहेत. एकूण १२५ मोटार नौका बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफची २६ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामुळे आतापर्यंत जवळपास सव्वा लाख लोकांचा जीव वाचवण्यात यश मिळाले आहे. अतिसारसारख्या संसर्गजन्य रोग पसरण्यासापासून आवश्यक औषधांची उपलब्धता करण्यात आली आहे.
बचावकार्यातून स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांसाठी १९९ शिबिर लावण्यात आली आहेत. यामध्ये जवळपास १ लाख १६ हजार लोकांनी आश्रय घेतला आहे. एकूण ६७६ सामूहिक स्वयंपाक गृहे बनविण्यात आली आहेत. गरज भासल्यास यामध्ये अजून भर घालण्यात येऊ शकते, अशी माहितीही नितीश कुमार यांनी दिली आहे.