महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 24, 2019, 10:16 PM IST

ETV Bharat / bharat

बिहार : हाजीपूरमध्ये मुथूट फायनान्समधून 55 किलो सोन्याची लूट, 21 कोटी आहे किंमत

हाजीपूर येथील यादव चौकातील फायनान्स कंपनीत या दरोडेखोरांनी ग्राहक बनून एकेक करून प्रवेश केला. यानंतर त्यांनी येथील सुरक्षा रक्षकावर बंदूक रोखली. तसेच, येथील 6 कर्मचाऱ्यांनाही बंदूकीचा धाक दाखवून त्यांनी 55 किलो सोन्याची लूट केली आणि ते पसार झाले.

मुथूट फायनान्समधून 55 किलो सोन्याची लूट

वैशाली -बिहारमध्ये हाजीपूरमध्ये मुथूट फायनान्समधून 55 किलो सोन्याची लूट झाली आहे. वैशाली येथील शहर ठाणे परिसरात हा दरोडा पडला. या सोन्याची किंमत तब्बल २१ कोटी रुपये आहे. 8 दरोडेखोरांनी फायनान्स कंपनीच्या ऑफिसमधून ही लूट केली.

बिहार : हाजीपूरमध्ये मुथूट फायनान्समधून 55 किलो सोन्याची लूट, 21 कोटी आहे किंमत

मुथूट फायनान्स कंपनीच्या ऑफिसमध्ये शिरताच दरोडेखोरांनी येथील सुरक्षारक्षकाला डांबून ठेवले. यानंतर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करत सोन्याची लूट करून ते पसार झाले. हा दरोड्याची माहिती मिळताच अनेक पोलीस ठाण्यांमधील पोलीस घटनास्थळी हजर झाले. तिरहुत विभागाचे पोलीस महानिरीक्षक गणेश कुमार हे घटनेची चौकशी करत आहेत.

बंदूकीचा धाक दाखवून केली लूटमार

हाजीपूर येथील यादव चौकातील फायनान्स कंपनीत या दरोडेखोरांनी ग्राहक बनून एकेक करून प्रवेश केला. यानंतर त्यांनी येथील सुरक्षा रक्षकावर बंदूक रोखली. तसेच, येथील 6 कर्मचाऱ्यांनाही बंदूकीचा धाक दाखवून त्यांनी 55 किलो सोन्याची लूट केली आणि ते पसार झाले. पोलीस चौकशी करत आहेत. मात्र, अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी जिल्ह्याची सीमा सील केली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टँड येथे शोध मोहीम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details