महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भारताच्या आण्विक इतिहासातील मोठा दिवस; काक्रापारा अणुप्रकल्पातील यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन' - Kakrapar atomic power plant

शास्त्रज्ञांनी यशस्वीपणे देशी बनावटीचे न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर तयार करण्यात यश मिळविले आहे. पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताची घौडदौड सुरु असल्याचे शाह म्हणाले.

अमित शाह
अमित शाह

By

Published : Jul 22, 2020, 7:19 PM IST

नवी दिल्ली -केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील काक्रापारा अणुउर्जा प्रकल्पातील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. शास्त्रज्ञांनी यशस्वीपणे देशी बनावटीचे न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर तयार करण्यात यश मिळविले. पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाची घौडदौड सुरु असल्याचे शाह म्हणाले.

शाह यांनी शास्त्रज्ञांचे ट्विट करून अभिनंदन केले आहे. 'देशी बनावटीचे 700 MWe न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर काक्रापारा अणुउर्जा प्रकल्पात तयार करण्यात आले आहे, भारताच्या अणू क्षेत्रातील इतिहासात हा मोठा दिवस आहे. या भव्य यशासाठी शास्त्रज्ञांना देशाचा सलाम. पंतप्रधान मोदींचे आत्मनिर्भर भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताची घौडदौड सुरु आहे, असे ट्विट शाह यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनीही भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. देशी बनावटीचे रिअ‌ॅक्टर मेक इन इंडियाचे चमकते उदाहरण असल्याचे मोदी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details