जयपूर -पंजाब पोलिसांनी जयपूरमध्ये अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करताना कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मागील १५ दिवसातील पंजाब पोलिसांची जयपूरमधील ही दुसरी कारवाई आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंजाब पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन अधिनियमानुसार ही कारवाई करण्यात आली.
पंजाब पोलिसांची जयपूरमध्ये मोठी कारवाई.. 6 कोटींचे अमली पदार्थ जप्त - Punjab police action
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई करताना करधनी ठाणे परिसरातून कोट्यवधी रुपयांची अंमली पदार्थ जप्त केले आहेत.
पंजाब पोलिसांची जयपूरमध्ये मोठी कारवाई
जयपूर शहरातील करधनी ठाणा परिसरातील मयूर विहारजवळील एका घरात पंजाब पोलिसांनी छापा मारून अमली पदार्थ व्यापाराचा पर्दापाश केला. पंजाब पोलिसांनी घटनास्थळावरून 10.20 लाखाच्या अमली पदार्थ गोळ्या, 80 हजाराचे कफ सिरप आणि 16 हजाराचे इंजेक्शन्स जप्त केली आहेत. या सर्वांची एकत्रित किंमत जवळपास ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही पंजाब पोलिसांनी जयपूरमधील आणखी एक कारवाई करत ४ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते.