भोपाळ - 'तुम्ही 'हिंदुत्व' हा शब्द का वापरत आहात? माझ्या शब्दकोशात असा कोणताच शब्द नाही,' असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
माझ्या शब्दकोशात 'हिंदुत्व' हा शब्दच अस्तित्वात नाही - दिग्विजय सिंह - bhopal
दिग्विजय सिंह यांना, 'हिंदुत्व' या मुद्द्यावर निवडणुकीत मतांचे विभाजन होईल असे वाटते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी 'हिंदुत्व' हा शब्दच आपल्या शब्दकोशात अस्तित्वात नाही, असे उत्तर दिले.
![माझ्या शब्दकोशात 'हिंदुत्व' हा शब्दच अस्तित्वात नाही - दिग्विजय सिंह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3063861-thumbnail-3x2-dig.jpg)
दिग्विजय सिंह यांना, 'हिंदुत्व' या मुद्द्यावर निवडणुकीत मतांचे विभाजन होईल असे वाटते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी 'हिंदुत्व' हा शब्दच आपल्या शब्दकोशात अस्तित्वात नाही, असे उत्तर दिले.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भोपाळमधून भाजपची उमेदवारी देण्यात आली आहे. सिंह यांनीच विरोधक भाजप नेत्यांविषयी प्रथम 'भगवा दहशतवाद' असा शब्द वापरला होता.
यानंतर सिंह यांनी हिंदू धर्म विश्वास आणि आस्थेचा विषय असल्याचे ट्विट केले. 'मी हिंदू धर्माला मानतो. या धर्माला मी कधीही हिंदुत्वाच्या हवाली करणार नाही, जे फक्त आणि फक्त राजकीय सत्ता मिळवण्यासाठी याचा वापर करतात. हे संघाचे कारस्थान आहे. सनातन हिंदू धर्म संपूर्ण पृथ्वीलाच एक घर मानतो. त्यामुळे मी माझ्या नर्मदा परिक्रमेचा किंवा राघोगढ मंदिरातील परंपरांचा प्रचार केला नाही. तसेच, अनेक दशकांपासून करत असलेल्या गोवर्धन परिक्रमा आणि पंढरपूरच्या दर्शनाचा गवगवा केला नाही. हे भाजपचे लोक माझ्या आणि देवाच्या मध्ये कसे आले? देवाचे 'एजंट' बनून 'सर्टिफिकेट' देणारे ते कोण आहेत? संघाचे हिंदुत्व लोकांना जोडत नाही. तर, तोडते. मी माझ्या धर्माचे राजकीय अपहरण होऊ देणार नाही. आमच्यासाठी हिंदू धर्म आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. देवाशी आमचे व्यक्तिगत नाते आहे,' असे सिंह यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.