पिवळ्या साडीवालीनंतर निळी ड्रेसवाली महिला पोलिंग अधिकारी व्हायरल, कोण आहे ही निलपरी ? - photo viral
ती पिवळी साडीवाली कोण, हे समजल्यानंतर आता लोक निळ्या ड्रेसवाल्या महिलेला नेटवर शोधू लागले आहेत. फेसबुकपासून व्हॉट्सअपपर्यंत सर्वच सोशल मीडिया साईटवर निळ्या ड्रेसवाल्या महिलेचे फोटो फिरत आहेत.

भोपाळ
भोपाळ - गेल्या काही दिवसांपासून पिवळ्या साडीवाल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत आहेत. त्यानंतर आता निळ्या ड्रेसवाल्या महिला अधिकाऱ्याचेही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे आता ही महिला अधिकारी कोण असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत.