महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुहूर्त ठरला...! 5 ऑगस्टला होणार राममंदिराचे भूमिपूजन - ram temple

बहुप्रतिक्षित अध्योयेतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला आहे. पुढच्या महिन्यात 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती सुत्रांनी दिली.

bhoomi-poojan-of-ram-mandir-on-5th-august-in-ayodhya
मुहुर्त मिळाला...! 5 ऑगस्टला होणार राममंदिराचे भूमिपूजन

By

Published : Jul 19, 2020, 11:14 AM IST

Updated : Jul 19, 2020, 1:10 PM IST

नवी दिल्ली -बहुप्रतिक्षित अध्योयेतील राम मंदिराच्या भूमिपूजनाला मुहूर्त मिळाला आहे. पुढच्या महिन्यात 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. अशी माहिती सूत्रांनी दिली.

कामेश्वर चौपाल (सदस्य, राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट)

अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची शनिवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राम मंदिरात 5 घुमट आणि मंदिराची उंची 161 फुटांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत विश्वस्त संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते आणि मंदिराच्या बांधकामासंदर्भात सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली.

अयोध्येतील राम मंदिरांची 161 फूट उंची असेल आणि आता तीनऐवजी पाच घुमट बांधले जातील. राम मंदिर बांधकामाच्या भूमीपूजनसाठी ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाला 3 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट अशा दोन तारखा सूचवण्यात आल्या आहेत. आता याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात येईल, असं चंपत राय यांनी सांगितलं आहे, असे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले.

बैठकीत राम मंदिराच्या एकूण डिझाइनवर चर्चा झाली. विश्व हिंदू परिषदेने प्रस्तावित केलेल्या डिझाइनच्या आधारे राम मंदिर तयार केले जाईल. मात्र, मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी सुमारे साडेतीन वर्षे लागतील. कोरोना विषाणूमुळे बांधकामांचे काम लांबणीवर पडले आहे.

Last Updated : Jul 19, 2020, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details