ठाणे - भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे येथे खून झाल्याची घटना घडली होती. मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन रोडवर २५ वर्षीय वयोगटातील अनोळखी महिलेची आठ दिवसांपूर्वी तीक्ष्ण हत्याराने हात, पाय व मुंडके छाटून निर्वस्त्र मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये कोंबून फेकून दिला होता. तर हात, पाय व मुंडके प्लास्टिकमध्ये गुंडाळून हे अवयव ताडाळी (फेणापाडा ) येथील एका नाल्यात फेकून दिल्याची घटना घडली होती.
विशेष म्हणजे प्लास्टिक ड्रम हा तारापूर येथील केमिकल कंपनीतून भिवंडीतील एका डाईंगमध्ये आणण्यात आला होता. तो एका कामगाराने नेवून त्याची विक्री भंगारवाल्याला केली होती. त्याच्याकडून ड्रम आरोपी हमीद याने खरेदी केला होता. त्या ड्रममध्ये पत्नीची हत्या केलेला मृतदेह कोंबून तो भाड्याने टेंपो खरेदी करून त्यावाटे मृतदेह फेकून दिला होता. सदरचा ड्रमचा प्रवास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा आधार घेऊन पोलिसांनी महिलेच्या खूनाचा उलगडा केला आहे. पतीने चारित्र्याच्या संशयावरून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सायरा हमीद सरदार (२७ रा. बबिताची खोळी ,देवजीनगर ) असे निर्घृण खून झालेल्या महिलेचे नांव आहे. सदर महिलेची हत्या तिचा पती हमीद मदरअली सरदार (२७ ) यानेच केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.