नवी दिल्ली- भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. बुधवारी त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आज ते तुरुंगातून बाहेर आले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनादरम्यान, दिल्लीतील दरियागंज भागात २० डिसेंबरला हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने बुधवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. न्यायालयाने हा निर्णय देताना आझाद यांना १६ फेब्रुवारीपर्यंत कोणतेही आंदोलन वा मोर्चा आयोजित न करण्याचे आदेश दिले होते.