भिलवाडा(राजस्थान) - राजस्थानचा भिलवाडा जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. जिल्ह्यात ७ एप्रिलला सापडलेला शेवटच्या कोरोनाबाधित रुग्णाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. राज्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थान सतर्क है या टॅगलाईनखाली मोहीम चालवली होती.
राजस्थानचा भिलवाडा जिल्हा पूर्णतः कोरोनामुक्त, शेवटच्या रुग्णाच्या दोन चाचण्या निगेटीव्ह - राजस्थानचा पहिला कोरोनामुक्त जिल्हा भीलवाडा
जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी सांगितले, की भीलवाडा जिल्ह्यात आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. सद्यस्थितीत दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. त्यानंतर ते १४ दिवस क्वारंटाईन असतील.

जिल्हाधिकारी पुढे सांगतात, की मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांसह उच्च अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भिलवाडा जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे ते सर्व प्रयत्न यशस्वी ठरले. अशा प्रकारच्या रोगाशी पहिल्यांदा सामना होत होता, त्यामुळे हे काळजीपूर्वक हाताळणे, हेच मोठे आव्हान होते. राज्य सरकारच्या स्तरावर झालेल्या मॉनिटरींगने हिम्मत दिली. भिलवाडा जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी येथील जनतेचे खूप मोठे सहकार्य असल्याचेही जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट सांगतात.