महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी - भारतीय किसान युनियन

किसान युनियन संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना निनावी नंबरवरून जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांत दिली तक्रार
पोलिसांत दिली तक्रार

By

Published : Dec 26, 2020, 9:45 PM IST

लखनऊ- दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून भारतीय किसान युनियन ठिय्या आंदोलनात आघाडीवर आहे. भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना निनावी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कौशांबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांत दिली तक्रार

अज्ञात व्यक्तीने फोनवरून टिकैत यांना किती हत्यारे पाहिजेत? असा प्रश्न विचारला. टिकैत यांनी प्रतिप्रश्न केला असता, तुम्हाला मारण्यासाठी किती हत्यारे घेवून यावे लागतील, असे उत्तर या व्यक्तीने दिले. एका मंदिर प्रकरणी राकेश टिकैत यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. या प्रकरणात त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

मागील ३२ दिवसांपासून राकेश टिकैत यांच्या नेतृत्त्वाखाली उत्तर प्रदेश सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून टिकैत सतत माध्यमांपुढे असतात. धमकीचा फोन आल्यानंतर तत्काळ त्यांनी पोलितांत तक्रार दिली आहे. फोन नंबरचा शोध घेवून आरोपीला तत्काळ अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास इंदिरापुरम या क्षेत्रीय पोलीस ठाण्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details