लोकसभेसाठी भाजपकडून ११ उमेदवारांची चौथी यादी जाहीर; तेलंगणातील ११ तर उत्तर प्रदेशातील ३ जागांचा समावेश - मतकंदन २०१९
कैरानामधून माजी खासदार हुकुम सिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांचे तिकीट कापण्यात आले असल्याचे समोर आले आहे.
भाजप केंद्रीय निवडणूक समिती बैठक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ११ लोकांचा समावेश आहे. तेलंगणातील ११, उत्तर प्रदेशातील ३ आणि केरळ व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एका जागेसाठी घोषणा करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील कैराना येथून प्रदीप चौधरी, बुलंदशहरमधून भोला सिंह आणि नगीना येथून डॉ. यशवंत यांना तिकीट मिळाले आहे. कैरानामधून माजी खासदार हुकुम सिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांचे तिकीट कापण्यात आले असल्याचे समोर आले आहे.