महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतीय सेनेसाठी मेक इन इंडियाअंतर्गत 'सर्वत्र पूल', नदी आणि डोंगराळ भागात ठरणार उपयुक्त - bharat earth movers sarvatra bridge

ही प्रणाली युद्धावेळी वाहतूक करण्यासाठी तात्पुरते पूल तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. युद्धसमयी मुख्यतः डोंगराळ प्रदेश आणि नद्यांच्या वरून जाण्यासाठी हा 'सर्वत्र पूल' बनवण्यात येणार आहे. या पुलाचा वापर केल्यानंतर याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेणेही शक्य आहे. याची लांबी 15 मीटर आहे आणि यावरून 70 टन वजन वाहून नेणे शक्य आहे.

सर्वत्र पूल

By

Published : Nov 12, 2019, 8:55 AM IST

पलक्कड - केरळच्या पलक्कडमधील कांचीकोडमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील भारत अर्थ मूवर्स लिमिटेडने (BEML) सैन्याच्या वाहतुकीसाठी 'सर्वत्र पूल' बनवला आहे. हा पूल भारतीय सेनेकडे सोपवण्यात आला आहे. हा पूल 'मेक इन इंडिया प्रोजेक्ट' अंतर्गत बनवण्यात आला आहे.

भारतीय सेनेसाठी मेक इन इंडियाअंतर्गत 'सर्वत्र पूल'

ही प्रणाली युद्धावेळी वाहतूक करण्यासाठी तात्पुरते पूल तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. युद्धसमयी मुख्यतः डोंगराळ प्रदेश आणि नद्यांच्या वरून जाण्यासाठी हा 'सर्वत्र पूल' बनवण्यात येणार आहे. या पुलाचा वापर केल्यानंतर याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेणेही शक्य आहे. याची लांबी 15 मीटर आहे आणि यावरून 70 टन वजन वाहून नेणे शक्य आहे.

या पुलामध्ये पाच वाहनांचे मिश्रण आहे. बीईएमएलने कांचीकोडमध्ये आयोजित समारंभात भारतीय सेनेला अशा प्रकारचे पूल बनवू शकणाऱया पाच वाहनांचे एकूण तीन संच सोपवले आहेत. या वेळी, बीईएमएल रक्षा अनुसंधानचे संचालक, आर. एच. मुरलीधरन, मेजर एस. राधाकृष्णन आणि कर्नल अमनदीप जैन उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details