महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'ती क्लिप बनावट, त्यातील व्यक्ती मी नव्हेच'; काँग्रेसचे निलंबित आमदार भंवरलाल यांचे स्पष्टीकरण - राजस्थान लेटेस्ट बातमी

भंवरलाल शर्मा यांनी मात्र आपल्यावरील या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सदर ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसून तो बनावट असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

'ती क्लिप बनावट, त्यातील व्यक्ती मी नव्हेच'; काँग्रेसचे निलंबित आमदार भंवरलाल यांचे स्पष्टिकरण
'ती क्लिप बनावट, त्यातील व्यक्ती मी नव्हेच'; काँग्रेसचे निलंबित आमदार भंवरलाल यांचे स्पष्टिकरण

By

Published : Jul 17, 2020, 10:46 AM IST

जयपूर - 'व्हायरल होणारी ऑडिओ क्लिप बनावट आहे. त्यामधील आवाज माझा नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसमधून निलंबित केलेले आमदार भंवरलाल शर्मा यांनी दिले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सहाय्यक लोकेश शर्मा बनावट ऑडिओ बनवून आमदारांना दबाव टाकत असल्याचाही आरोपही भंवरलाल यांनी केला आहे. काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग भाजपसोबत बोलणी करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यानंतर पक्षाने दोन्ही आमदारांना पक्षातून निलंबित केले आहे.

'ती क्लिप बनावट, त्यातील व्यक्ती मी नव्हेच'; काँग्रेसचे निलंबित आमदार भंवरलाल यांचे स्पष्टिकरण

भंवरलाल यांनी सचिन पायलट यांच्यासोबत मिळून राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी हालचाली केल्या. भंवरलाल यांचा अनेकदा भाजपशी संबंध राहिलेला आहे. मात्र, ते यामध्ये कदापि यशस्वी होणार नाहीत. आता पुन्हा एकदा भंवरलाल यांनी पायलट यांच्यासोबत मिळून पक्षतोडण्यासाठी प्रयत्न केले. ते भाजपच्या मदतीने सरकार बनवण्याचे स्वप्न पाहत असल्याचेही काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

भंवरलाल शर्मा यांनी मात्र आपल्यावरील या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. सदर ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसून तो बनावट असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. घोडेबाजार करून भाजप राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप गहलोत यांनी लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details