गया -महात्मा गौतम बुद्ध यांना बिहारच्या बोधगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, असे म्हटले जाते. आता पुन्हा एकदा याच ज्ञानस्थळावरून एक बौद्ध भिक्षु त्याग आणि दानाचे महत्व सांगण्यासाठी गावोगाव फिरून गरजवंताच्या मदतीसाठी समोर आला आहे. याशिवाय गरजुंना राशन देखील उपलब्ध करून देत आहेत.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुद्धांच्या वाटेवर चालून बोद्ध भिक्षु भंताची गरजवंताना मदत गरजुंना जेवण -
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे दैनंदिन मजुंरांसोबत ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची सध्या हलाखीची परिस्थिती आहे. बौद्ध भिक्षु विशाल यांनी अशा गरजु व्यक्तींसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली आहे.
बौद्ध भिक्षु भंता विशाल यांना बालपणापासूनच लोकांची सेवा करण्यात आनंद मिळतो. त्याचमुळे ते लहानपणीच घर सोडून बोधगया महाबोधी मंदिरात आले होते. तिथे त्यांनी दीक्षा घेऊन भिक्षु बनले. भंता विशाल यांनी आत्तापर्यंत खजवती, दुमुहान, भागलपूर, सरस्वती, बसाड़ी, कॉलोनी यांच्यासोबत अनेक गाबात जेवणाची व्यवस्था करून गरजु व्यक्तींना जेवण पुरवले आहे.
विशाल याबाबत सांगतात, की 'माझ्याजवळ दान म्हणून मिळालेले ५० हजार रुपये जमा होते. त्यामुळे आत्ताच्या कठीण परिस्थितीत मला या पैशांचा सदुपयोग करण्याची चांगली संधी मिळाली. याच पैशातून मी गरजुंसाठी शक्य होईल ती मदत करत असतो'.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुद्धांच्या वाटेवर चालून बोद्ध भिक्षु भंताची गरजवंताना मदत स्थानिक लोक देखील करताहेत मदत -
१८ वर्षीय विशाल सांगतात, की बुद्धांनी जगाला त्याग आणि शांतीचा संदेश दिला आहे. आज संपूर्ण देश कठीण परिस्थीतीचा सामना करत आहे. मी देखील बुद्धांनी दिलेल्या ज्ञानाच्या वाटेवर चालून गरजवंताच्या मदतीसाठी पुढे आलो आहे. या कार्यात मला स्थानिक नागरिकांचे देखील सहकार्य मिळत आहे', असे त्यांनी सांगितले.
भविष्यातील कामासंबधी सांगताना ते म्हणाले, की 'माझी प्राथमिकता ही गरिबांची सेवा करणेच आहे. अशात मला एक विद्यालय सुरू करण्याची इच्छा आहे. ज्यामध्ये गरीब, निर्धन शिक्षण घेऊ शकतील. कारण, गरिबीची मुळ कारण हे अशिक्षितपणा आहे, असे मला वाटते'.
बोधगया पर्यटन स्थळ म्हणून परिचीत आहे. त्यामुळे येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येत असता. महाबोधी मंदिर हे बौद्ध संप्रदायाचे मुख्य तीर्थस्थळ आहे. त्यामुळे येथे दरवर्षी पर्यटकांची रेलचेल असते. यंदा, मात्र, कोरोना विषाणूमुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.