हैदराबाद- प्लास्टिकचा करण्यात येणारा मोठ्या प्रमाणात वापर हा आपल्या शरिराला अपायकारक ठरत आहे. अभ्यासानुसार, आठवड्यात 50 ग्रॅम तर, महिन्याला सुमारे 250 ग्रॅम प्लास्टिक मनुष्याचे शरिरात जात आहे. प्लास्टिकचा वाढता वापर हा मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे.
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असलेल्या पाण्यात प्लास्टिकचे सुक्ष्म कण आपोआप पाण्यात मिसळतात. हे सुक्ष्म प्लास्टिक पाण्यातून आपल्या शरीरात जात आहे. याचबरोबर मासे, मीठ यांच्या माध्यमातून देखील प्लास्टिक आपल्या शरीरात जात आहे. तसेच धुळीच्या माध्यमातूनही प्लास्टिकचे सुक्ष्म कण आपल्या शरीरात जात असल्याचे ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांन आपल्या अभ्यासात आढळले आहे.
तुम्हाला हे माहीती आहे का?
- मागील २ दशकात प्लास्टिकच्या उत्पादनात बेसुमार वाढ झाली आहे.
- ग्रँड व्ह्यू रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, प्लास्टिक उद्योग हा 2025 पर्यंत 4 टक्क्याने वाढेल.
- उत्पादन क्षेत्र, उद्योग आणि 3 डी प्रिंटिंगमध्ये मायक्रो प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
- उत्पादित केलेले 75% पेक्षा अधिक प्लास्टिक हे नॉन-बायोडिग्रेडेबल कचऱ्यात बदलत आहे.
- दरवर्षी सुमारे 10 कोटी टन प्लास्टिक निर्माण होत असून प्रतिवर्षी 24 लाख टन प्लास्टिक समुद्र, नद्यांमध्ये मिसळत आहे.
प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल?
- प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांचा वापर करू नका.
- कापडी पिशव्या वापरा.
- आपल्या घरामध्ये धूळ साचु देऊ नका.
- शक्य तेवढे, शुद्ध मीठ वापरावे आणि दूषित पाणी पिऊ नये.
प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात कसे जाते?
समुद्र आणि इतर जलस्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळत आहे. हे प्लास्टिकचे लहाण तुकडे मासे खातात. मानवी अन्न साखळीच्या माध्यमातून प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात जाते. सूक्ष्म प्लास्टिक देखील सागरी मीठांचाच एक भाग बनले आहे. आपण समुद्री मीठ वापरतो तेव्हा काही प्लास्टिकचे कण आपल्या शरीरात प्रवेश करतात.