महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशातील वाहतूक पोलिसाकडून गणपतीचा मुखवटा वापरत जनजागृती - बैतूल वाहतूक पोलीस

गणेश चतुर्थीच्या दिवशी बैतूलमधील एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने गणपतीचा मुखवटा चेहऱ्यावर लावून आणि मास्क घालून रस्त्यावर वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली. मास्क आणि हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांना या कर्मचाऱ्याने मास्क व हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगितले.

traffic police
वाहतूक पोलिसाकडून अनोख्या पद्धतीने जनजागृती

By

Published : Aug 23, 2020, 3:33 PM IST

बैतूल -मध्य प्रदेशच्याबैतूल शहरातील वाहतूक पोलिसाकडून वाहनधारकांंमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जागृतीसाठी अनोख्या मार्गाचा वापर करण्यात आला. गणपतीचा मुखवटा लावून एक पोलीस कर्मचारी वाहनधारकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावण्याचा संदेश देत होता. त्या पोलिसाने वाहनधारकांना वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी पत्रकदेखील वाटले.

गणपतीचा मुखवटा लावून पोलिसाकडून जनजागृती

गणेश चतुर्थीच्या दिवशी बैतूलमधील एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने गणपतीचा मुखवटा चेहऱ्यावर लावून आणि मास्क घालून रस्त्यावर वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली. मास्क न वापरणाऱ्या आणि हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांना या कर्मचाऱ्याने मास्क व हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगितले. वाहनधारकांचे प्रबोधन करत त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले.

हेही वाचा-'विद्यार्थ्यांची मन की बात ऐका'; जेईई व नीट परीक्षांबाबत राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत, असे वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस अधिकारी गजेंद्र यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्याने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गणपतीच्या मुखवट्याचा वापर केला. यावेळी त्या कर्मचाऱ्याने हेल्मेट असल्यावरच दुचाकी वाहन चालवावे, असे आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याबाबत जागृती करण्यात आले, असे गजेंद्र यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details