नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणून थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन डोसची मदत करण्यात आल्याने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. त्यावर मोदींनी टि्वट करत मित्र देशांना मदत करण्यास भारत कधीही तयार आहे. मिळून ही लढाई जिंकू, असे टि्वट केले आहे.
जगभरामध्ये पसरलेल्या साथीच्या रोगाविरोधात आपल्याला एकत्रितपणे लढा द्यावा लागले. आपल्या मित्रांना शक्य तेवढी मदत करण्यास भारत तयार आहे. इस्त्रायच्या नागरिकांना कल्याण व आरोग्य लाभो, असे टि्वट मोदींनी केले आहे.
पंतप्रधान मोदी आणि बेंजामीन नेत्यान्याहू यांचे 3 एप्रिलाला फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी एचसीक्यू गोळ्यांची मागणी भारताकडे केली होती. भारताने मदत केल्यानंतर बेंजामीन नेत्यान्याहू यांनी टि्वट करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाचा पुरवठा केल्याबद्दल माझे प्रिय मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांचे आभार मानतो , असे नेत्यान्याहू यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
हाड्रोक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करण्यास भारताने परवानगी दिल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांनीही मोदींचे आभार मानले आहेत.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनयाच्या वापरामुळे मृत्यूदर कमी होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मागणी होत आहे.