बंगळुरू(कर्नाटक) - सोशल मीडियावर खोटे मेसेज, अफवा, आक्षेपार्ह तसेच तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे बंगळुरूच्या एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले. समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज करण्यात काहीच अर्थ नाही. अशा लोकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या सर्वांवर कारवाई करणार असल्याचे बंगळुरूचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राव यांनी पुढे सांगितले, की पोलीस विभाग खोट्या मेसेजेसवर बारीक लक्ष ठेऊन आहेत. लॉकडाऊननंतर या सर्वांवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. एका समुदायाला लक्ष्य करून असे मेसेज पसरवणाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. समाजात तेढ आणि द्वेष निर्माण करण्याऐवजी या जागतिक महामारीचा मिळून सामना करण्याचे आवाहन त्यांनी केले. चांगले नागरिक बना आणि समाजात नकारत्मकता न पसरवण्याची विनंती त्यांनी केली.