बंगळुरू- जमावबंदी आणि संचारबंदीच्या काळात पोलिसांकडून माणूसकीचे दर्शन घडणाऱ्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. संचारबंदीदरम्यान गरीबांच्या जेवणाची व्यवस्था बंगळुरू पोलिसांनी केली आहे. 7 विभागांतील डीसीपी, निरीक्षक आणि आपापल्या स्थानकांचे उपनिरीक्षक पोलीस ठाण्याच्या आसपासच्या गरीबांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.
लॉकडाऊन : बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय, स्वतः जेवण बनवून केले वाटप - कोरोना विषाणू
बंगळुरूमध्ये पोलीस कर्मचारी स्वत: जेवण बनवून गोरगरीबांना वाटत आहेत.
![लॉकडाऊन : बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय, स्वतः जेवण बनवून केले वाटप Bengaluru police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6616932-953-6616932-1585718690374.jpg)
बंगळुरू पोलिसांकडून गरीबांच्या भोजणाची सोय
यावेळी पोलीस कर्मचारी स्वतः मास्क लावून जेवण बनवून गरीबांमध्ये वाटप करत आहेत. पोलिसांनी गरीबांसाठी चहा, भात आणि सांबर इत्यादींचे वितरण केले आहे.