महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना रुग्णांच्या छायाचित्रीकरणावर बंदी; बंगळुरू पोलिसांचा निर्णय.. - कोरोना रुग्ण छायाचित्र बंदी

जेव्हा एखाद्या 'कोविड-१९' रुग्णाला रुग्णालयात नेले जाते, तेव्हा आजूबाजूला असणारे लोक, आणि पत्रकारही त्यांची छायाचित्रे घेतात. अशा प्रकारे छायाचित्रे घेणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे हे त्यांच्या गोपनीयतेचा भंग आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही छायाचित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी स्पष्ट केले.

Bengaluru Police bans photographing corona patients
कोरोना रुग्णांच्या छायाचित्रीकरणावर बंदी; बंगळुरू पोलिसांचा निर्णय..

By

Published : Jun 22, 2020, 5:06 PM IST

बंगळुरू - कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेले जात असताना त्यांची छायाचित्रे घेण्यास, किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास बंगळुरू पोलिसांनी मज्जाव केला आहे. अशा प्रकारे छायाचित्रे घेतल्यामुले, किंवा रेकॉर्डिंग केल्यामुळे आपल्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचा कित्येक कोरोना रुग्णांनी आरोप केला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जेव्हा एखाद्या 'कोविड-१९' रुग्णाला रुग्णालयात नेले जाते, तेव्हा आजूबाजूला असणारे लोक, आणि पत्रकारही त्यांची छायाचित्रे घेतात. ही छायाचित्रे त्या नागरिकांच्या परवानगीशिवाय घेतली जातात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांना अपमानित झाल्यासारखे वाटते. तसेच, अशा प्रकारे छायाचित्रे घेणे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणे हे त्यांच्या गोपनीयतेचा भंग आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही छायाचित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे, असे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी स्पष्ट केले आहे.

या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी यासाठी आयुक्तांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :सर्वोच्च न्यायालयाची जगन्नाथ रथ यात्रेला परवानगी; मात्र...

ABOUT THE AUTHOR

...view details