बंगळुरू- देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे हाल होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरुजंना पुलीकेशी ट्राफीक पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल स्वतःच्या पैशांनी जेवण पुरवतात.
'मी' भोगलेली परिस्थिती दुसऱ्यावर येऊ नये.. पोलीस कॉन्स्टेबल स्वतःच्या पैशातून पुरवतात गरजूंना अन्न - बंगळुरू पोलीस कॉन्स्टेबल
अंत्यत प्रतिकुल परिस्थितीतून समोर आलेले पोलीस कॉन्स्टेबल लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न पुरवत आहेत. आपल्यासारखी परिस्थिती कोणावर येऊ नये यासाठी ते ही मदत करत आहेत.
यमनाप्पा कोनारी, असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. ते विजयपुरा जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील रहिवासी असून ते २०१२ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले. त्यांनी २००७ मध्ये नोकरीच्या शोधात बंगळुरू गाठले. त्यानंतर त्यांनी डिएलएक्स कंपनीत सेल्समन म्हणून काम केले. महिनाभर काम करूनही त्यांना पगार मिळाला नाही. त्यांनी नोकरी सोडली. मात्र, जवळ पैसे नव्हते. मग त्यांनी इमारतीच्या बांधकामासाठी मजूर म्हणून केले. त्यानंतर घरी पाठवायला काही पैसे जमा झाले. शेवटी पीयुसीच्या नियमांनुसार पोलीस कॉन्स्टेबल पदावर रुजू झाले. आपल्यासारखी परिस्थिती कोणावर येऊ नये यासाठी ते गरजूंना मदत करत असतात. लॉकडाऊनच्या काळात देखील ते गरजूंना अन्न पुरवतात.