महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सँडलवूड ड्रग्ज प्रकरणी विवेक ओबेरॉयच्या पत्नीला बंगळुरू सीसीबीची दुसरी नोटीस - सँडलवूड मादक पदार्थ तस्करी न्यूज

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याची पत्नी प्रियंका अल्वा यांना सीसीबी पोलिसांनी बुधवारी सँडलवूडच्या कथित मादक पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दुसरी नोटीस बजावली. त्यांना 20 ऑक्टोबरला सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यांचा भाऊ आदित्य अल्वाविरोधात कॉटन पीट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक ओबेरॉयच्या पत्नीला बंगळुरू सीसीबीची दुसरी नोटीस
विवेक ओबेरॉयच्या पत्नीला बंगळुरू सीसीबीची दुसरी नोटीस

By

Published : Oct 17, 2020, 5:25 PM IST

बंगळुरू - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याची पत्नी प्रियंका अल्वा यांना सीसीबी पोलिसांनी बुधवारी सँडलवूडच्या कथित अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी दुसरी नोटीस बजावली.

हेही वाचा -'उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था मृतावस्थेत'

या प्रकरणात आदित्य अल्वा बेपत्ता आहे. प्रियंका अल्वा आदित्य अल्वाची बहीण आहे. त्यामुळे सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सर्च वॉरंटद्वारे प्रियंका यांच्या मुंबईतील निवासस्थानी शोध घेतला. काल सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी सीसीबीने त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, त्या हजर नव्हती. यामुळे सीसीबीने सुनावणीला उपस्थित राहण्याबद्दल प्रियंका यांना आज दुसऱ्यांदा नोटीस बजावली.

सीसीबी अधिकाऱ्यांनी आज पुन्हा नोटीस बजावत प्रियंका यांना 20 ऑक्टोबरला सुनावणीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यांचा भाऊ आदित्य अल्वाविरोधात कॉटन पीट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -'महिला अत्याचारावर चर्चा करण्यास मुख्यमंत्री योगींकडे वेळ नाही'

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details