बंगळुरू : मार्वल सिनेमॅटिक युनिवर्समधील सुपरव्हिलन 'थॅनोस' आपल्या सर्वांना माहित आहे. चित्रपटामध्ये विश्वाचा समतोल राखण्यासाठी अर्ध्या लोकसंख्येला चुटकीसरशी नष्ट करणारा थॅनोस, बंगळुरुमध्ये मात्र लोकांना हातावरील विषाणू नष्ट करण्याचा संदेश देत आहे. हे शक्य झाले आहे, बंगळुरुमधील प्रसिद्ध ग्राफिटी आर्टिस्ट बादल नांजुंदास्वामी यांच्यामुळे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आरोग्यासंबंधी संदेश देण्यासाठी ते अभिनव पद्धत वापरत आहेत.
बादल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आपल्या कलाकृतींची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. एकामध्ये चक्क थॅनोस आपले हात धुताना दिसून येत आहे.