आसाम- आसाममधील पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याखाली गेले आहे. यामुळे वन्य प्राणी मिळेल तसा आणि मिळेल तिथे आश्रय घेत आहेत. असाच एक बंगाल टायगर आश्रयासाठी चक्क एका घरातील बेडरुममध्ये जाऊन बेडवर बसलेला दिसून आला.
आश्रयासाठी वाघोबा थेट बेडरुममध्ये; काझीरंगा अभयारण्यातील प्रकार - asaam flood
आसाममधील पुरामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याखाली गेले आहे. यामुळे आश्रयाच्या शोधात असलेला एक बंगाल टायगर एका घरातील बेडरुममध्ये बसलेला दिसून आला.
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील वाघ आश्रयासाठी पोहोचला थेट बेडरूममध्ये
काझीरंगामधील हरमाती भागातील एका घरात हा वाघ दिसून आला. याबद्दलची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. दरम्यान आसाममध्ये पुरामुळे सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यात २७ जिल्ह्यांमधील गावे पाण्याखाली गेली आहेत. ज्यातील जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.