महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

स्थलांतरित मजुरांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्या; ममता बॅनर्जींची मागणी.. - ममता बॅनर्जी स्थलांतरित मजूर

दिल्लीमध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट करत याबाबत मागणी केली. यासाठी पंतप्रधान मोदींच्या पीएम-केअर फंडचा काही भागही वापरला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या आहेत.

Bengal CM urges Centre to give Rs 10,000 each to migrants
स्थलांतरित मजूरांना प्रत्येकी दहा हजार रुपये द्या; ममता बॅनर्जींची मागणी..

By

Published : Jun 3, 2020, 3:54 PM IST

कोलकाता -स्थलांतरित मजूरांना मदत म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. यासोबतच, असंघटीत कामगारांनाही अशाच प्रकारची मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिल्लीमध्ये होणाऱ्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या काही वेळापूर्वी त्यांनी ट्विट करत याबाबत मागणी केली. यासाठी पंतप्रधान मोदींच्या पीएम-केअर फंडचा काही भागही वापरला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या आहेत.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही मदत गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :भारत-बांगलादेश सीमेजवळ 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

ABOUT THE AUTHOR

...view details