महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा कसा लागू करता मी पाहतेच'

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आंदोलन छेडले आहे.  बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा कसा लागू करता हे मी पाहतेच', असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी

By

Published : Dec 18, 2019, 4:09 PM IST

कोलकाता - नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात आंदोलन छेडले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यात न लागू करण्याची भूमिका विरोधकांनी घेतली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शाह यांना आव्हान दिले आहे. तुम्ही बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा कसा लागू करता हे मी पाहतेच', असे त्या म्हणाल्या.

तुम्ही (अमित शाह) फक्त भाजपचे नेते नसून देशाचे गृहमंत्री आहात. त्यामुळे देशामध्ये शांतता प्रस्थापित करा. तुम्ही सबका साथ सबका विकास तर नाही केला मात्र सर्वांचा एकत्रपणे सर्वनाश केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी परत घ्या. तुम्ही बंगालमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा कसे लागू करता ते मी पाहते, असे आव्हानच ममता यांनी शाह यांना दिले आहे.

हेही वाचा -आपल्याच सरकारविरोधात भाजप आमदारांचे आंदोलन; विरोधकही झाले सहभागी


नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ईशान्य भारतासह दिल्ली, पश्चिम बंगालमध्ये आंदोलन सुरू आहेत. नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी करण्यापूर्वी (केंद्र सरकार) माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल, असा इशारा बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला दिला होता.

हेही वाचा -CAA protest: हरियाणातील नूह जिल्ह्यात आंदोलन, २ हजार पोलीस सुरक्षेसाठी तैनात

ABOUT THE AUTHOR

...view details