वाराणसी - शहरातील एका अतिथीगृहामध्ये पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेलारूसमधील एक 55 वर्षीय पर्यटकाचा गुरवारी शहरातील शिवाला परिसरातील अतिथीगृहातील खोलीत मृतदेह आढळला आहे. गेल्या 28 तारखेपासून पर्यटक अतिथीगृहात राहात होता.
बेलारूसमधील पर्यटकाचा वाराणसीत मृत्यू...
बेलारूसमधील एक 55 वर्षीय पर्यटकाचा गुरवारी शहरातील शिवाला परिसरातील अतिथीगृहातील खोलीत मृतदेह आढळला आहे.
संबधित पर्यटक फेब्रुवारीमध्ये आणखी एका साथीदारासह शहरात आला होता. हे दोघे शिवाला परिसरातील अल्विस गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. त्याचा साथीदार काही दिवसांनी निघून गेला होता. मात्र,लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे तो भारतामध्ये अडकला.
दरम्यान पोलीस आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळाची तपासणी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल, असे अधिकारी म्हणाले. तसेच बेलारूस दूतावासाला पर्यटकांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.