महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

#Covid: हिमाचल प्रदेशात भिक्षेकऱ्यांनी दिला माणुसकीचा धडा; 1 क्विंटल धान्य केले दान - रत्नम

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्याने काम मिळत नाही यामुळे गरींबावर उपासमारीची वेळ आलीय. भीक मागून पोट भरणारे आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असणारे रत्नम आणि नेपाळी बाबा यांनी अन्नदान केल्याने त्यांना सर्वत्र सलाम केला जात आहे.

beggar-providing-food-to-needy-people-in-kullu
#Covid: हिमाचल प्रदेशात भिक्षेकऱ्यांनी दिला माणुसकी धडा; 1 क्विंटल धान्य केले दान

By

Published : Apr 2, 2020, 1:46 PM IST

कुल्लू- 20 वर्षांपासून भीक मागून पोट भरणाऱ्या रत्नम आणि नेपाळी बाबा यांनी कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असाताना गरजूंसाठी 1 क्विंटल धान्य केले दान करून माणुसकी दाखवली आहे. रत्नम आणि नेपाळी बाबा हे मूळचे आंध्रप्रदेश मधील आहेत. कुल्लू शहरात गेल्या 20 वर्षांपासून ते राहतात.

जिल्ह्यातील एका अन्नपूर्णा संस्थेला दोघांनी 50 किलो गव्हाचे पीठ, 50 किलो तांदूळ, 10 किलो डाळ आणि इतर किराणा वस्तू दान केल्या आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कोणीही गरीब उपाशी राहू नये या भावनेतून त्यांनी हे काम केले. रत्नम आणि नेपाळी बाबा यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत असून त्यांनी दाखवलेल्या माणुसकीला सर्वजण सलाम करत आहेत.

अन्नपूर्णा संस्थेद्वारे गेल्या काही वर्षांपासून रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना दोन्ही वेळचे जेवण पुरवले जाते. लॉकडाऊन सुरु असताना अन्नपूर्णा संस्था कुल्लुमधील बजौरा नाक्याजवळ दररोज 4 हजार लोकांचे जेवण पॅकेटसमध्ये पोहोचवत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details