सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. भिकाऱ्याला लोकांनी दगडाने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान घटनास्थळी पोलीस आल्यावर पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पश्चिम बंगालमध्ये मुले पळवण्याच्या संशयावरुन भिकाऱ्याची जमावाकडून दगडाने ठेचून हत्या - west bengal
जलपाईगुरी जिल्ह्यातील नागकाता येथे सोमवारी सकाळी सुखानी झोपडपट्टीतील मुले पळवणारा असल्याच्या संशयावरून एका भिकाऱ्याला लोकांनी दगडाने मारहाण केली. यात भिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
भिकाऱयाची जमावाकडून हत्या
कोलकाता - मुले पळवणारा असल्याच्या संशयावरून एका भिकाऱ्याची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली. जलपाईगुरी जिल्ह्यातील नागकाता येथे सोमवारी सकाळी सुखानी झोपडपट्टीत हा धक्कादायक प्रकार घडला.
आम्ही लोकांच्या तावडीतून भिकाऱ्याची सुटका केली. मात्र रुग्णालयात नेईपर्यंत भिकाऱ्याचा मृत्यू झाला. येथील परिसरात मुले पळवण्याची कोणतीही घटना घडली नाही. मात्र अफवेमुळे एकाचा नाहक बळी गेला आहे. असे उप-विभागीय अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी सांगितले. यात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.