महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

breaking अयोध्या निकाल : मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणार

मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात आयोध्या निकाला विरोधात पुनर्याचिका दाखल करणार, असा निर्यण आज घेण्यात आला. अयोध्या निकालावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीआधी मुस्लिम पक्षकारांचे वकील जफरयाब जिलानी आणि लॉ बोर्डाच्या सदस्यांनी सर्व मुस्लिम पक्षकारांची भेट घेतली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

जफरयाब जिलानी

By

Published : Nov 16, 2019, 3:01 PM IST

Updated : Nov 16, 2019, 3:14 PM IST

लखनऊ- मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात अयोध्या निकालाविरोधात पुनर्याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या निकालावर चर्चा करण्यासाठी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची रविवारी बैठक होणार आहे. या बैठकीआधी मुस्लिम पक्षकारांचे वकील जफरयाब जिलानी आणि सदस्यांनी मुस्लिम पक्षकारांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्यही उपस्थित होते.

रविवारी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बैठक लखनऊमधील नवदा कॉलेजमध्ये होणार आहे. त्याआधीच पुनर्याचिका दाखल करण्यावर एकमत झाले. सर्वोच्च न्यायालयाने मशिद बांधण्यासाठी ५ एकर जागा देऊ केली आहे, याबाबतही आज चर्चा झाली.


सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिर -बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. या निकालात न्यायालयाने ही वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रतिवादी मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर देशभरातून समाधान व्यक्त करण्यात आले तर काही मुस्लिम संघटनांनी आणि व्यक्तींनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत नाराजी व्यक्त केली.

Last Updated : Nov 16, 2019, 3:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details