नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणू बाधित ३१ रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन टाळण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान दरम्यान असलेल्या अटारी-वाघा सीमेवर नियमितपणे होणाऱ्या 'बीटिंग रिट्रीट' कार्यक्रमावर बंधणे घालण्यात आली आहेत.
हेही वाचा -'कोरोना' विद्यापीठे अन् महाविद्यालयांनाही झटका.. सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत युजीसीची नवी नियमावली
बिटिंग रिट्रीट कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता येणार नाही. २० ते २५ हजार नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतात. मात्र, आता कोरोनाच्या प्रसारामुळे नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, असे अमृतसरचे उपायुक्त शिवदुलार धिंलाँन यांनी सांगितले.
हेही वाचा -दिल्लीमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण, देशातील एकूण संख्या ३१ वर..
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सामूहिक कार्यक्रम टाळण्याचे सरकारने आवाहन केले आहे, त्यामुळे नागरिकांना कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. मात्र, बिटिंग रिट्रीट सुरूच राहणार राहणार असल्याचे सीमा सुरक्षा दलाने सांगितले.