मुंबई - टी-20 विश्व करंडक स्पर्धा पुढे ढकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतल आहे. मात्र, ही स्पर्धा भारतात होणार नसून, संयुक्त अरब अमिरात येथे होणार आहेत. बीसीसीआयच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंगळवार आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी गृहमंत्रालयाकडे या संदर्भात परवानगी मागितली होती. त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून आयपीएलसाठी हिरवा कंदील
टी-20 विश्व करंडक स्पर्धा पुढे ढकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही स्पर्धा भारतात होणार नसून, संयुक्त अरब अमिरात येथे होणार आहेत.
क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून आयपीएलसाठी हिरवा कंदील
पटेल म्हणाले, की आम्ही सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मोठ्या प्रयत्नानंतर सरकारने आयपीएल भरवण्यासाठी परवानगी दिली आहे. लवकरच सरकारशी बोलून आयपील परिषद स्पर्धेचे वेळापत्रक ठरवणार आहे. हे वेळापत्रक अंदाजे पुढच्या आठवड्यात जाहीर केले जाणार असल्याचे चेअरमन पटेल यावेळी म्हणाले.