महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खूशखबर ! महिलांच्या जनधन खात्यात 500 रुपयांचा दुसरा हप्ता सोमवारी होणार जमा - प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

केंद्र सरकारकडून महिलांच्या जनधन खात्यात सोमवारपासून 500 रुपयांचा दुसरा हप्ता जमा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ही रक्कम देण्यात येत आहे.

जनधन खात्यात पाचशे रुपये
जनधन खात्यात पाचशे रुपये

By

Published : May 2, 2020, 2:26 PM IST

नवी दिल्ली -कोरोना विषाणूच्याप्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यात 500 रुपये रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेचा पहिला हप्ता यापुर्वीच जमा झाला होता. त्याच योजनेअंतर्गत पाचशे रुपयांचा दुसरा हप्ता सोमवारपासून जमा होणार आहे.

हेही वाचा...कोरोनामुळे ६० वर्षांनंतर महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात पडली लक्ष्मण रेषा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारे आर्थिक संकट टाळता यावे, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत पुढील तीन महिने देशातील ज्या महिलांचे जनधन खाते आहे त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक महिलेच्या खात्यात दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी ही रक्कम काढण्यासाठी काही ठराविक तारखा देखील ठरवून देण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मार्चमध्ये याबाबत घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार महिलांच्या जनधन बँक खातेधारकांना सोमवारपासून 500 रुपयांचा दुसरा हप्ता मिळणे सुरू होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details