महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लालूंना भेटण्यास बंदी; मोदी सरकार त्यांना विष देऊन मारण्याच्या प्रयत्नात, राबडी देवींचा आरोप - BJP

दर, शनिवारी लालू प्रसाद यादव यांना भेटण्याची परवानगी असते. मात्र, यावेळी तुरुंग प्रशासनाने कोणालाही त्यांना भेटू न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे यावेळीही तेजस्वी यादव यांना वडिलांची भेट घेता आली नाही.

राबडी देवी (संग्रहित छायाचित्र)

By

Published : Apr 20, 2019, 9:01 PM IST

रांची -बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची भेट घेण्यास आज तुरुंग अधिक्षकांनी बंदी आणली होती. त्यामुळे यावेळीही त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांना आपल्या वडिलांची भेट घेता आली नाही. लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगत आहेत. मात्र, प्रकृती अस्वस्थतेमुळे ते झारखंडच्या रिम्स रुग्णालयात भर्ती आहेत.


दर, शनिवारी लालू प्रसाद यादव यांना भेटण्याची परवानगी असते. मात्र, यावेळी तुरुंग प्रशासनाने कोणालाही त्यांना भेटू न देण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे यावेळीही तेजस्वी यादव यांना वडिलांची भेट घेता आली नाही. मागच्या वेळीही ते लालूंना भेटण्यास रुग्णालयात आले होते. मात्र, उशीर झाल्याचे कारण सांगत प्रशासनाने त्यांना भेटू दिले नव्हते. यावेळी त्यांच्यावर अशीच पाळी आली.


तुरुंग अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या पत्नी राबडी देवी अतिशय संतप्त झाल्या आहेत. लालू प्रसाद यादवांना केंद्र आणि राज्य सरकार विष देऊन मारण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप त्यांनी केला. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्यांना भेटू दिले जात नाही. लालूंसोबत ही सरकार हुकूमशाही व्यवहार करत आहे. सरकार वेडी झाली आहे. त्यांना संपूर्ण लालू परिवार संपवायचे आहे. बिहारची जनता रस्त्यावर उतरली तर परिणाम वाईट होतील. मात्र त्यांची मक्तेदारी चालणार नाही, असेही त्या म्हणाल्या.


बिहारमध्ये आरजेडी, काँग्रेस, राष्ट्रीय लोक समता पक्ष, हम पक्ष आणि विकासशील पक्ष आघाडी करुन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे बिहार येथील एनडीए पक्षांसाठी मोठे आव्हान उभे झाले आहे. तर, बिहारमधून भाजपचे दिग्गज नेतेही निवडणूक लढत आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार, असा दावा केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details