महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इम्रान खान यांच्या भाषणादरम्यान बलुचिस्तान कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ - Washington DC,

कासमी चळवळ (एमक्यूएम) आणि इतर अल्पसंख्याक गटांनी इम्रान खान यांचा वाशिंगटन डी.सी. मध्ये निषेध केला आहे.

इम्रान खान

By

Published : Jul 22, 2019, 8:58 AM IST

वॉशिंग्टन -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. इम्रान खान यांचा हा अधिकृत दौरा असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. कासमी चळवळ (एमक्यूएम) आणि इतर अल्पसंख्याक गटांनी इम्रान खान यांचा वॉशिंग्टन डी.सी. मध्ये निषेध केला आहे.


वॉशिंग्टन डी.सी. मधील एका कम्युनिटी कार्यक्रमादरम्यान इम्रान खान यांच्या भाषणामध्ये मुत्तहिदा कासमी चळवळीच्या (एमक्यूएम) आणि इतर अल्पसंख्याक गटांनी व्यत्यय आण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

इम्रान खान सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या दरम्यान ते संरक्षण, व्यापार आणि कर्जासारख्या विषयांवर चर्चा करणार आहेत. सोमवारी हे दोन नेते सहभोजनही करणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details