हैदराबाद -आंध्रप्रदेशमधील चित्तुर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने हत्तीचे लहान पिल्लु दगावल्याची घटना घडली आहे. आज (रविवार) सकाळी वनविभागाच्या हद्दीत असणाऱ्या विजेच्या तारांजवळ ही घटना घडली.
विजेच्या धक्क्याने हत्तीच्या पिल्लाचा जागीच मृत्यू - हत्तीचे पिल्लु
सीमेवर असणाऱ्या वीजेच्या तारांना हत्तीच्या पिल्लाला धक्का बसला. यामध्ये पिल्लाचा जागीच मृत्यू झाला.
हत्तीचे पिल्लु त्याच्या आईसोबत जंगलात फिरत होते. पंरतु, सीमेवर असणाऱ्या विजेच्या तारांचा हत्तीच्या पिल्लाला धक्का बसला. यामध्ये पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. हत्तीच्या आईने जवळपास अर्धा तास पिल्लाला उठवण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर, मृत हत्तीच्या पिल्लाचे शवविच्छेदन करुन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून वीजेच्या तारा जंगलाच्या सीमेवर उघड्या पडल्या आहेत. यातून वीज प्रवाहही सुरू आहे. अनेकवेळा तक्रार देऊनही वीज कंपनीने यावर कोणतेही पाऊल उचलले नाही, अशा प्रतिक्रिया या घटनेनंतर शेतकऱयांनी दिल्या आहेत.