दुमका - मुंबईतील एका मॉडेलने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यावरून झारखंडमधील राजकारण तापलं आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेता बाबूलाल मंराडी यांनी हेमंत सोरेन यांचा राजीनामा मागितला आहे. तसेच याप्रकरणी सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपकडून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्याची मागणी मुंबईतील एका मॉडेलने हेमंत सोरेन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. यासंबधित एक लेटर व्हायरल होत आहे. हेमंत सोरेन आणि सुरेश नागरे यांनी 2013 साली मॉडेलवर बलात्कार केला होता. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकीही दिली होती. अशा आशयाचे पत्र मुंबई पोलिसांनी पीडितेने लिहलं आहे.
महिला आयोगाने सोरेन यांना बजावली नोटीस -
राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मांनी या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून या प्रकरणी सविस्तर अहवाल मागितला आहे. तसेच महिला आयोगाने सोरेन यांना नोटीस बजावली आहे.
सीबीआयने चौकशी करावी -
अभिनेत्री बनवण्याचं आश्वासन देऊन बलात्कार केल्याचे मॉडेलने सांगितले होते. 2013 मध्ये संबधित मॉडेलने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लग्न आणि केस लढू शकत नसल्याचे कारण देत, तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर पुन्हा 8 डिसेंबरला 2020 ला मॉडेलने बांद्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने चौकशी करावी आणि सोरने यांनी मुख्यमंत्री पदाचा राजिनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेता बाबूलाल मंराडी यांनी केली आहे.
हेमंत सोरेन झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री -
'झारखंड मुक्ती मोर्चा'चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून 29 डिसेंबरला शपथ घेतली होती. येत्या 29 डिसेंबरला त्यांच्या सरकारला वर्षपूर्ती होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे पक्ष एकत्र लढले होते. यात 81 पैकी 47 जागा जिंकून त्यांनी बहुमत मिळवले, आणि भाजपला आणखी एका राज्यातून आपली सत्ता गमवावी लागली. या 47 जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्चाला 30, काँग्रेसला 16 तर राजदला 1 जागा मिळाली होती.
हेही वाचा -पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी अनुकूल करणे : मूल्यांकन पीएमएफबीवायचे