हैदराबाद : अयोध्येच्या इतिहासातून बाबरी मशीदीचे नाव कधीही पुसले जाणार नाही, असे वक्तव्य ऑल इंडिया मज्लिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
"बाबरी मशीद होती, आहे आणि पुढेही राहील; बाबरी जिंदा है" अशा आशयाचे ट्विट करत ओवैसींनी हे म्हटले आहे. अयोध्येमधील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज पार पडला. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने (एआयएमपीएलबी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर ओवैसींनी आपले मत मांडले.
बाबरी मशीदीची घटना अयोध्येच्या इतिहासातून पुसली जाणार नाही - ओवैसी पंतप्रधान आज म्हणाले, की हा एक भावनिक क्षण आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की हा माझ्यासाठीही एक भावनिक क्षण आहे. कारण, मी समान नागरिकत्वावर विश्वास ठेवतो. माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे, कारण त्या ठिकाणी एक मशीद गेल्या ४५० वर्षांपासून उभी होती, असे ओवैसी म्हणाले.
तर मुस्लिम लॉ बोर्डाचे सचिव मौलाना वली रहमानी म्हणाले, की देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यावाचून आमच्याकडे दुसरा पर्यायही नाही. मात्र, न्यायालाने दिलेला निर्णय हा अन्यायकारक होता हे नक्की.
हेही वाचा :राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न