लखनऊ -केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर आज भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. बाबरी मशीद हिंचाराबाबत त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडणार आहे.
बाबरी मशीद : विशेष न्यायालय मुरली मनोहर जोशींचा जबाब नोंदवणार - Ram Chandra Khatri
बाबरी मशीद प्रकरणी भाजपाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा विशेष न्यायालय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवणार आहे. संबंधित प्रकरणात आतापर्यंत कल्याण सिंह, उमा भारती, आरोपी सुधीर कक्कड आणि रामचंद्र खत्री यांचे जबाब दैनंदिन सुनावणी दरम्यान नोंदवण्यात आले आहेत.
येत्या २४ जुलैला न्यायालय लालकृष्ण आडवाणी यांचा देखील जबाब ऑनलाइन पद्धतीने नोंदवणार आहे. कलम ३१३ नुसार क्रिमिनल प्रोसीजर कोड अंतर्गत त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहेत. दोषारोपपत्रानुसार स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अन्य ३२ आरोपींचे जबाब नोंदवण्यात येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी दैनंदिन सुनावणी सुरू आहे. २२ जुलैला शिवसेनेचे माजी खासदार सतिश प्रधान यांची देखील जबाबानुसार ऑनलाइन साक्ष नोंदवण्यात आली.