चंडीगढ़ - प्रसिद्ध महिला कुस्तीपटू आणि भाजप नेत्या बबिता फोगाट यांनी केलेल्या एका ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. बबिता यांनी तबलिगी संदर्भात एक ट्विट केले होते. यानंतर काही लोकांनी त्यांच्यावर या ट्विटमुळे निशाणा साधला होता. मात्र, बबिता यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्यासाठी दिल्लीत मरकजमध्ये जमलेल्या जमातींना जबाबदार ठरवले जात आहे. देशातून अनेक स्तरावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर तेच दुसरीकडे अनेक लोकांनी त्यांची बाजू घेतली आहे. 'कोरोना विषाणू समस्या ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची समस्या आहे. जमाती अजूनही पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून आहेत', असे ट्विट बबिता यांनी केले होते. त्यांनी केलेल्या या ट्विटनंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. एका व्यक्तीने म्हटले, 'तुम्हाला एका मुस्लिम व्यक्तिने चित्रपट बनवून प्रसिद्धी मिळवून दिली. या देशात अनेक वर्षात क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळाडू पानीपुरी (गोलगप्पे) विकताना दिसून आली'.
तर बबिता यांच्यावर होणाऱ्या टिकेला पाहून ऑलम्पिक खेळाडू योगेश्वर दत्त त्यांच्या समर्थानार्थ उतरले आहेत. त्यांनी टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. ते म्हणाले, खेळाडू पानीपुरी (गोलगप्पे) विकून मेहनतीने पैसे कमावून खातात. फ्रीचे तर नाही खात ना? चित्रपटाची कमाई कोणी खाल्ली? आयुष्यात काही केले म्हणून चित्रपट निघाला. नाही तर तुम्हीच आपल्या स्वत:वर एखादा चित्रपट बनवा.