नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या पत्नी ताझीन फातमा यांच्या खाद्यांला सीतापूर जिल्हा कारागृहातील स्नानगृहात घसरुन पडल्यामुळे मार लागला आहे. त्यानंतर लगेचच फातमा यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या खाद्यांला प्लास्टर करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारागृहातील स्नानगृहात घसरुन पडल्या आझम खान यांच्या पत्नी, खाद्यांला लागला मार - आझम खान यांच्या पत्नी
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या पत्नी तझीम फातमा यांच्या खाद्यांला सीतापूर जिल्हा कारागृहातील स्नानगृहात घसरुन पडल्यामुळे मार लागला आहे. त्यांच्या खाद्यांला प्लास्टर करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचे कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.
Azam Khan
आमदार ताझीन फातमा, पती आझम खान आणि मुलगा अब्दुल्ला यांना खोटे जन्म प्रमाणपत्र बनविल्याबद्दल दोषी ठरविण्यात आल्यानंतर तुरुंगवास भोगावा लागत आहे. 28 फेब्रुवारी 2020 पासून हे तिघेही सीतापूर कारागृहात आहेत.
सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रमझानच्या वेळी आझम कुटुंबियांना तुरूंगातून सोडण्याची मागणी केली होती. मात्र, यावर सरकारने काहीच उत्तर दिले नाही.
Last Updated : May 11, 2020, 2:33 PM IST